पनवेल: मन की बात : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद – पनवेल, कामोठे आणि खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
Panvel, Raigad | Nov 30, 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय मासिक संवाद मालिकेचा १२८ वा भाग रविवारी ३० नोव्हेंबर रोजी देशभर प्रसारित झाला. ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूज वेबसाइट, न्यूजऑनएअर अप तसेच विविध सरकारी यूट्यूब चॅनेल्सवरून हा कार्यक्रम थेट ऐकविण्यात आला. हिंदी प्रसारणानंतर लगेचच देशभरातील प्रादेशिक भाषांमध्येही कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या संवादाला पनवेल, कामोठे आणि खारघर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.