हिंगोली: थोरजवळा गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांनी घेतली धाव
हिंगोलीच्या थोर जवळा गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदानाची रक्कम अपेक्षेपेक्षा अत्यल्प प्रमाणात जमा झाल्याने शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील तब्बल ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अल्प रक्कम जमा झाली, तर पंचनाम्यात दाखविलेल्या नुकसानाच्या प्रमाणाशी ती रक्कम कोणत्याही प्रकारे सुसंगत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.