मागील काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये वेशांतर करून मुलं चोरणारी टोळी आली होती आणि मुलं चोरण्याच्या हेतूने प्रयत्न करत होती.मात्र सतर्क नागरिकांमुळे त्यांचा प्लॅन फसला. त्यानंतर आता बदलापूर मध्ये देखील मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. मुलं चोरण्याच्या हेतूने आलेल्या टोळीवर नागरिकांना संशय आल्यानंतर विचारपूस केली असता तेवढ्यात काही चोरटे पळून गेले.मात्र एक नागरिकांच्या तावडीत सापडला. त्याला चांगला चोख देऊन त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे