शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० सुरू तकरण्यात आला आहे. अभियानांतर्गत शाळा आणि महाविद्यालये तंबाखूमुक्त करणे आणि तरुणांमध्ये तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. युवा पिढी यात जास्त प्रमाणात गुरफटली गेली असल्याचे निदर्शासनाचे येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी याप्रसंगी सांगितले आहे. यावेळी तंबाखू मुक्तीसाठी पथनाट्य व शहरातुन तंबाखूमुक्त सायकल रॅली विद्यार्थ्यांसह काढण्यात आली.