सेलू: जुवाडी येथे एकास काठीने मारून केले जखमी, सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 16, 2025 मोबाईलचा हप्ता का भरत नाही. या कारणावरून वाद करीत एकास काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना ता. 15 बुधवारी रात्री 8 वाजता जुवाडी येथे घडली. स्वप्नील हरिभाऊ वाघमारे वय 32 रा. जुवाडी असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून प्रतीक प्रमोद वाघमारे वय 20 रा. जुवाडी याच्या विरुद्ध रात्री 11 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती ता. 16 ला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.