सातारा: सातारा नगरपालिका निवडणूक : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून संचलन
Satara, Satara | Nov 29, 2025 सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी येत्या मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सातारा पोलीस दलाने सदर बाजार परिसरात भव्य संचलन केले. तसेच, नागरिकांनी कोणताही दबाव न घेता आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता जनजागृती करण्यात आली.