नाशिक शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशात नाशिकरोड गुन्हेशोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. तडीपार आरोपी कृष्णा चंदु चव्हाण (वय २३, रा. अश्विनी कॉलनी, नाशिकरोड) यास गावठी कट्टा, मॅगझिन व एक जिवंत काडतूसासह अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीनुसार साईनाथनगर, मरी माता मंदिराच्या पाठीमागील परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यास शिताफीने पकडले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास