पाथर्डी: सोनई येथील जातीयवादी गुंडानी केलेल्या मारहाणीविरोधात मागासवर्गीय समाजाचं आंदोलन.. कठोर कारवाईची मागणी...
सोनई येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर जातीयवादी गुंडानी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यात सदर तरुणाचे हात, पाय व डोळे निकामी झाले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.