बुलढाणा: किनगाव राजा येथील पाताळगंगा नदीला मोठा पूर, नागरिकांनी सतर्क राहण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात आज 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता अनेक भागात जोरदार पाऊस झाला.यामुळे किनगाव राजा येथील पाताळगंगा नदीला मोठा पूर आलेला असून पाण्याची पातळी वाढत आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगली असे आवाहन तहसील प्रशासनाने केली आहे.