आर्णी: अरुणावती नदीला आला पूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली
Arni, Yavatmal | Sep 27, 2025 सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अरूनवती धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाण्याचा दबाव वाढल्याने प्रशासनाने धरणाचे तब्बल ११ दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे अरूनवती नदीला पूर आला असून आर्णी शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. मोमिनपुरा, शास्त्री नगर, प्रकाश नगर आणि मालानी नगर या भागांमध्ये घराघरात पाणी शिरले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. अनेक घरांतील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर साहित्याच