सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे.या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते.तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले.संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे.