साक्री: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत केले गरोदर;पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील घटना
Sakri, Dhule | Nov 24, 2025 साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात राहणाऱ्या पिडीत १६ वर्षीय मुलीने पिंपळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार,एका 30 वर्षीय तरुणाने पिडीतेसोबत वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्तापित करीत तिला गरोदर केले. हा प्रकार एप्रिल ते जुन २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.