तळा: शहरातील बाजारपेठ येथे तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली मतदार जनजागृती रॅली
Tala, Raigad | Mar 27, 2024 तळा शहरातील तळा बाजारपेठ येथे बुधवार दि.२७ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार स्वाती पाटील यांच्या कडून करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार मंगेश पालांडे, तलाठी रविंद्र मालुसरे यांसह तहसील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.