उमरखेड: ढाणकी नगरपंचायत: काँग्रेस इच्छुक उमेदवारांची उमरखेड कार्यालयात 'चाचपणी' पूर्ण
ढाणकी नगरपंचायत २०२५ च्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली असून, पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखत (चाचपणी) उमरखेड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. नगरपंचायत निवडणुकीचा कार्यकाळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची ही महत्त्वपूर्ण मुलाखत प्रक्रिया पार पडली.