दिंडोरी तालुक्यातील वनी येथील जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये सोनेवाडी तालुका निफाड येथील श्रीक्षेत्र शिव गोरक्षनाथ आश्रम येथील पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले . गेल्या सात वर्षापासून अविरत सुरू असलेल्या पायी दिंडी सोहळा यावर्षी आठव्या वर्षात पदार्पण करत असून कडाक्याच्या थंडीमध्ये अबाल वृद्ध पायी दिंडी वनी येथील जगदंबा मातेच्या मंदिरात विसावलेला आहे .