उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाव्यापी कार्यकर्ता मेळावे सुरू असून, याच मालिकेतील महत्त्वाचा मेळावा सोमवारी, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव येथे पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.