हिंगणघाट: शहरातील सफारा व्यवसायिकांना गंडा घालून कारागिराने लांबविले १४ लाख २७ हजार रुपयांचे सोने
हिंगणघाट शहरातील सराफा बाजारपेठेत सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करणाऱ्या कारागिराने येथील पांच सराफा व्यवसायिकांकडून सोने घेऊन नागपूर वरून दागिने तयार करून आणण्याचे सांगत १४ लाख २७ हजार रुपयाचे सोने लांबवील्याची घटना उघडकीस आली.घडल्याने येथील सराफा बाजारपेठेत खळबळ माजली आहे. या संबंधात कारंजा चौक येथील कनक ज्वेलर्सचे संचालक अनुप अजित कोठारी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी उज्वल गंगाधर माल हा गेल्या तीन वर्षापासून कारागीर म्हणून काम करीत होता.