अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावतीच्या मोर्शी येथील शाखेच्या इमारतीचे नूतनीकरण, वॉल कंपाऊंड बांधकाम, तसेच एटीएम चा लोकार्पण सोहळा आज दिनांक 9 डिसेंबरला दुपारी अडीच वाजता मोर्शी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार नरेशचंद्र जी ठाकरे, तथा अनेक मान्यवर उपस्थित होते