समुद्रपूर: मेनखात येथे बिबट्याचा उच्छाद: घरासमोरून उचलला कुत्रा:गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समुद्रपूर :तालुक्यातील मेनखात परिसरात बिबट्याच्या हालचालींनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील रहिवास. नारायण बावणे यांच्या घरासमोरील अंगणात असलेला कुत्रा अचानक बिबट्याने उचलून नेल्याची माहिती आज १५ ऑक्टोबर प्राप्त झाली आहे. घटना घडताच गावात एकच खळबळ उडाली. पोलीस पाटील मेनखात यांनी तातडीने ही बाब वनविभागाला कळवली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक . शशिकांत शेंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.