17 ऑक्टोबरला प्रणय तिवारी वय पस्तीस वर्ष हे त्यांची आजी सुषमा तिवारी यांच्यासोबत पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतून अमर नगर रोडने दुचाकीने जात असताना केटीएम दुचाकीच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरता वेगाने चालवून प्रणयच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रणय व सुषमा हे दुचाकीच्या खाली पडले व सुषमा या गंभीर जखमी झाल्या.