युवक हे राष्ट्राचे भविष्य असतात आणि त्यांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळणे हेच खरी प्रगतीची पायरी आहे. याच हेतूने महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय युवा महोत्सव वाशिम येथे उत्साहात साजरा होणार आहे. दि.५ नोव्हेंबर २०२५ रोजी वाटाणे लॉन, वाशिम येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात “कल्चरल ऍन्ड इनोव्हेशन ट्रॅक” अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.