दक्षिण सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजनेचा वडापूर गावात शुभारंभ...
दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजनेचे उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात करण्यात आले. आमदार सुभाष देशमुख यांचे प्रतिनिधी सरपंच रमेश आसबे आणि प्रशासक संदीप खरबस यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. योजनेअंतर्गत गावात सात समित्या स्थापन करून स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीचे काम सुरु करण्यात येणार आहे.