घाटंजी: पंगडी शेत शिवारातून 16 हजार 500 चा मुद्देमाल लंपास,आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हे दाखल
फिर्यादी भारत भाऊराव ठाकरे यांच्या तक्रारीनुसार 12 सप्टेंबरला आरोपी सुमित चव्हाण व आणखी एक अशा दोघांनी फिर्यादीच्या शेतातील सोलर झटका मशीन संच,सोलर प्लेट बॅटरी तसेच फिर्यादीच्या शेत शेजारी असलेल्या रुपेश वीरुटकर,मंगेश गवळी अविनाश कुंभारे यांच्या सुद्धा शेतातील सोलर झटका मशीन संचाच्या बॅटरी या असा एकूण 16500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी 13 सप्टेंबरला घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.