शेतातील झाडावर ट्रॅक्टर घातल्याच्या आणि झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी शेलपिंपळगाव येथे घडली.याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.