माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे भाजपतर्फे हिरे भवन येथे दिवाळीनिमित्त भव्य स्नेहमेळावा पार पडला. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजप जिल्ह्यात एकहाती सत्ता मिळवेल, असा विश्वास व्यक्त झाला. या मेळाव्याला डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, विजय चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.