भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हा अपघात वैजापूर तालुक्यातील गारज टोलनाक्याजवळ शनिवारी दुपारी १ वाजता घडला. कीर्तिकांत रामचंद्र कुलकर्णी (वय ४५, रा. रोहिला बु, जि. नाशिक) असे मयताचे नाव आहे.घटनेची शिऊर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.