कडेगाव: मोहिते वडगावच्या रेशन दुकानात ४१.५३ क्विंटल धान्य घोटाळा; दुकानाचा परवाना रद्द करत १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल
मोहिते वडगाव (ता. कडेगाव) येथील विकास सोसायटीच्या मालकीच्या रास्त भाव दुकानात 41.53 क्विंटल गहू व तांदळाचा घोटाळा उघड झाला असून, संबंधित दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. हा धान्य साठा "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना" अंतर्गत मोफत देण्यासाठी आलेला होता. गावातील सामाजिक कार्यकर्ते परशराम काळे यांनी या गैरव्यवहाराबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली आणि कडेगाव तहसीलदारांकडे तक्रार केली होती