शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या विविध गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेतर्फे उप जिल्हाधिकारी शरद पवार यांना धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.यावेळी शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.