आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित 66 किमी नाशिक परिक्रमा मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. नाशिक परिक्रमा मार्गासाठी आवश्यक भूसंपादनास मान्यता मिळाल्यानंतर संबंधित विभागांनी मोजणी पूर्ण करून भूसंपादन प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिले. शहरातील 9 ठिकाणी भूसंपादन आवश्यक असून व्यावसायिकांचे नुकसान झाल्यास त्याचे मूल्यमापन करून भरपाई निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले.