जळगाव शहरातील शेरा चौकात दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ८३ हजारांची रोकड चोरून नेणाऱ्या तिन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी दत्त नगर परिसरातून अटक केली आहे. तिघांकडून चोरीला गेलेली रोकड जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.