आज दिनाक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवान अनिल हेमराज बोरसे (वय ४१) यांना सेवा बजावत असताना वीरमरण आले आहे. पुणे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये जनरल ड्युटीवर कार्यरत असलेले जवान शहीद झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण पाचोरा तालुक्यासह खेडगाव नंदीचे परिसरात शोककळा पसरली आहे. शहीद अनिल बोरसे हे जुलै २००४ मध्ये सैन्यदलात भरती झाले होते.