यवतमाळ शहरातील दारव्हा मार्गावर शिवशाही एसटी बस फेल पडल्याने रस्त्यावर उभी होती.भरधाव वेगाने असलेला दुचाकीस्वार थेट उभ्या बसवर धडकला.या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याने प्राथमिक उपचार घेऊन पळ काढण्याची माहिती समोर आली.