बोदवड: बोदवड तालुक्यातील मनुर बुद्रुक गावातून १८ वर्षीय तरुणी झाली बेपत्ता, बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Dec 11, 2025 बोदवड तालुक्यात मनुर बुद्रुक हे गाव आहे. या गावातील रहिवासी साक्षी युवराज महाजन वय १८ ही तरुणी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.