उमराह यात्रेला पाठवण्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीने भाविकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे..मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशरफ अली वल्द आबीद अली यांना मक्का-मदीना येथे उमराह यात्रेसाठी जायचे होते.