धुळे: नाशिकनंतर आता धुळ्यातही 'मिशन निर्भया'; गरुड कॉम्प्लेक्स चौकात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या संशयितांना खाकीचा दणका!
Dhule, Dhule | Oct 17, 2025 नाशिकच्या ‘मिशन निर्भया’च्या धर्तीवर धुळे पोलिसांनी रोडरोमिओंवर धडक कारवाई केली. शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेऊन गरुड कॉम्प्लेक्स परिसरातून पायी चालवत नेण्यात आले आणि भररस्त्यात माफी मागायला लावण्यात आली. या कारवाईमुळे शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिला सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे.