राहुरी: देवळाली नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी वंचितकडून अॅड. प्रसाद सांगळे यांची उमेदवारी जाहीर
देवळाली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी दुपारी राहुरी फॅक्टरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या झालेल्या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली.सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ज्ञ म्हणून ओळख असलेले ॲडव्होकेट.प्रसाद सांगळे हे या निवडणुकीत पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असणार आहेत.