सिंदखेड राजा: शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून दिरंगाई जलसमाधी आंदोलन करणार - शेतकरी बालाजी सोसे
सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावात दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. शासनाने याबाबत मदत जाहीर करून आदेश काढले आणि पळसखेड चक्का गावाचा त्यात स्पष्ट समावेश केला होता. आजतागायत अनेक शेतकऱ्यांना ती मंजूर मदत मिळालेली नाही.मदत मिळण्यासाठी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे शेतकरी बालाजी सोसे यांनी सांगितले.