ऐतिहासिक बहिरंगेश्वर मंदिर परिसरात आयोजित श्रीकृष्ण चरित्र प्रवचनमालेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी सपत्नीक उपस्थित राहून दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी प्रख्यात प्रवचनकार मा. प. पू. श्री हरिभाऊ निटुरकर महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून श्रीकृष्णाच्या दिव्य लीला, निर्मळ भक्ती आणि मानवी जीवनातील संस्कार व मूल्यांचे महत्त्व विशद केले. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून, प्रवचनाच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळत