शेवगाव: डांगेवाडी शिवारात भीषण अपघात. एक जण जागीच ठार...
शेवगाव-पाथर्डी रस्त्यावरील डांगेवाडी शिवारात अपघाताने खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये यादव विश्वनाथ वाघमारे वयवर्ष ६० यांचा जागीच मृत्यु झाला आहे, प्राथमिक माहितीनुसार अल्टो कार शेवगावकडून पाथर्डीकडे भरधाव वेगाने येत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये कार आणि दुचाकी यांचं मोठं नुकसान झालंय. पोलिसांनी सदर घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.