बुट्टीबोरी एमआयडीसी फेज दोन स्थित आवाडा कंपनी येथे कैलास कैकाडी वय 37 वर्ष हा तरुण फोर्कलिफ्ट च्या खाली दबला. हा अपघात चार नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता 5 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान त्या मुलाच्या नातेवाईकांनी ज्या माया हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला त्या हॉस्पिटल वर गंभीर आरोप केले आहे.