चाळीसगाव: भारताचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा चाळीसगावी जाहीर निषेध; तहसीलदारांना निवेदन
चाळीसगाव, (प्रतिनिधी): भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयाचे कामकाज चालू असताना एका वकिलाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा चाळीसगाव शहरात विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या शिष्टमंडळाने आपल्या संतापी भावना व्यक्त करत येथील तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले.