लाखनी: पालांदूर येथे गोवर्धन पूजा; गोवारी समाजाने केले ढाल पूजन
दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गोवर्धन पूजनाचा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त पालांदूर येथील गोवारी समाज बांधवांनी श्रद्धा व उत्साहात ढाल पूजन करून परंपरा जपली. ही ढाल पूजनाची परंपरा 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास संपूर्ण पालांदूर शहरात करण्यात आली. गोवारी समाजात गोवर्धन पूजनाचा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी समाजबांधव पारंपरिक पोशाखात सजून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ढाल पूजन करतात.