गेल्या काही दिवसांपासून कमकाझरी आणि परिसरात पट्टेदार वाघाने चांगलीच दहशत माजवली असून, वन्य प्राण्यांच्या शिकारीसोबतच आता पाळीव जनावरांवरील हल्ले वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच येथील शेतकरी साधू बांधते यांच्या मालकीच्या वासराची वाघाने शिकार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तातडीने पावले उचलली असून, वाघाला जेरबंद करण्यासाठी कमकाझरी परिसरात शिकारीच्या ठिकाणी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे.