लाखनी: लाखनी येथील विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण पूरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश ! लाखनी बस स्थानक परिसरात काढल्या रांगोळ्या
शहरातील विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या माध्यमातून बसस्थानक परिसरात रांगोळीच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे संदेश देत पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व पर्यावरणीय विषयांवर आधारित रांगोळ्या साकारत “निसर्ग वाचवा, जीवन वाचवा”, “पर्यावरण संतुलन राखा”, असे संदेश दिले.