बुलढाणा: पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन;जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी पोलीस मुख्यालयात वाहिली श्रद्धांजली
दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस स्मृती दिन उत्साहपूर्वक आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बुलडाणा जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शहीद पोलीस जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.