भंडारा: भंडारा पोलिसांचे उल्लेखनीय यश : ऑगस्ट महिन्यात 12 बेपत्ता महिलांचा शोध
भंडारा जिल्हा पोलिसांनी ऑगस्ट महिन्यातील तपास मोहिमेत १२ बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत महिलांच्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारींनंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून तपास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत भंडारा, पवनी, साकोलीसह इतर पोलीस स्टेशनांतर्गत बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.