कन्नड: सासेगाव येथे गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
कन्नड तालुक्यातील सासेगाव येथे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.या वेळी बोलताना सावे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वाहिले; त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत.”कार्यक्रमाला खासदार डॉ. भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजनाताई जाधव, माजी आमदार उदयसिंग राजपूत यांची उपस्थिती लाभली.