अलिबाग: अलिबाग जुनी नगरपालिका नजिक स्विफ्ट कारची दुचाकीला ठोकर, दुचाकीस्वार स्वार किरकोळ जखमी
Alibag, Raigad | Apr 21, 2025 रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील जुन्या नगरपालिका नजिक आज सकाळी साडे नऊच्या सुमारास महाराष्ट्र शासनाची पाटी असलेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच ४६ए पी ९५११ या गाडीने कामत आळी येथून दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर अलिबाग शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. मात्र या अपघाताची अलिबाग पोलिस ठाण्यात सायंकाळी साडे सहा पर्यंत नोंद झाली नसल्याची माहिती अलिबाग पोलिस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.