सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तर्फे तयार करण्यात आलेल्या डिजिटल ई-ब्रोशरचे लोकार्पण
आज सोमवारी दुपारी २ च्या सुमारास सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तर्फे तयार करण्यात आलेल्या पहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे लोकार्पण पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. या ई-ब्रोशरमुळे पर्यटकांना थेट आरक्षणाची सोय तर मिळेलच, तसेच आपल्या वर्तमान स्थानावरून पर्यटक निवास किती अंतरावर आहे, हेही सहज तपासता येईल. त्यामुळे पर्यटन अनुभव सुलभ व सोयीस्कर होईल.