लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जटटू डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता मंजूर असुन सुद्धा काम चालू करत नसल्याने ठेकेदार व संबंधित विभागाच्या विरोधात भाजप नेते देवानंद सानप यांच्या नेतृत्वात रस्त्यावर नारळ फोडून व गणपती बाप्पाची आरती करून आंदोलन केले.यानेळी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.